टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
टेंभुर्णी (प्रतिनिधी):-
टेंभुर्णी येथील चायनीज हट या ठिकाणी टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी एलआयसीचे सेवानिवृत्त विकास अधिकारी लंगोटे साहेब यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डी.एस. गायकवाड , टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल जगताप , उपाध्यक्ष सतीश चांदगुडे, सचिव सुरज देशमुख, पत्रकार गणेश चौगुले, सतीश काळे, धनंजय भोसले,ॲड. अजिंक्य संगीतराव भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विजय कोकाटे, युवा नेते राम पवार , अविनाश धोत्रे, अजय पवार, योगेश पवार, विशाल पवार, रोहन जाधव, विकास पवार, प्रेमानंद धोत्रे, साहील पठाण, अंजन क्षीरसागर, जोतिराम माने आदी जण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा