*कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालय आय.सी.टी.सी.मध्ये जिल्ह्यात प्रथम*
कुर्डूवाडी प्रतिनिधी/आज दि.3 जानेवारी 2022 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग सोलापूर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर व डॉ.व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्या वतीने एचआयव्ही/ एड्स जनजागृती व निर्मूलन कार्यक्रम मधील 2021 या वर्षात केलेल्या कार्या बद्दल उत्कृष्ठ आय सी टी सी म्हणून ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी येथील एकात्मिक व समुपदेशन व चाचणी विभागाला (आयसीटीसी ) जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह मा.अधिष्ठाता डॉ.सवसकर मँडम व जिल्हा न्यायाधीश मा. रवींद्र मोकाशी साहेब यांचे हस्ते समुपदेशक कमरगणी तांबोळी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री सुरेश गोरमाळे यांना प्रदान करून गौरविण्यात आले
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री भगवान भुसारी सर, एआरटी पंढरपूर चे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ सयाजीराव गायकवाड साहेब, जिल्हा पर्यवेक्षक श्री कृष्णा सकट यांच्यासह जिल्ह्यातील सर्व समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ विविध सामाजिक संस्था कर्मचारी उपस्थित होते
सदर बहुमान सलग दुसऱ्या वेळेस ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी येथील एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रास मिळाला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा