महाड मध्ये अनधिकृत गुटखा विक्रीवर पुन्हा कारवाई
बिरवाडी टाकलेल्या धाडीत १ लाखाचा गुटखा जप्त
महाड – प्रतिनिधी
महाड मध्ये गुटखा विक्री तेजीत असून याबाबत गेली आठवडाभर कारवाईचे सत्र सुरु असून महाड शहर पोलीसांच्या पाठोपाठ एम.आय.डी.सी. पोलिसांनी देखील कारवाई करत एका टपरी चालकाला अटक केली आहे तर पुरवठा करणारा मात्र फरार झाला असल्याची माहिती महाड एम.आय.डी.सी.पोलिसांनी दिली.
महाड औद्योगिक पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाड औद्योगिक पोलीस ठाणे हद्दीतील काळीज गावात ऋतिका पान शॉप या टपरीवर पोलिसांनी धाड टाकली असता याठिकाणी सुमारे १ लाख ९ हजर ४८४ रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी टपरी मालक जयसिंग राजाराम दळवी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याला गुटखा पुरवठा करणारा सागर रेनोसे हा मात्र फरार झाला आहे. दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता हि कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी भाद्वी कलम ३८८, ३७३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा