Breaking

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात लसीकरण संपन्न*


*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात लसीकरण संपन्न*




तुळजापूर :-येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 15 ते 18 वयोगटातील विध्यार्थी -विध्यार्थीनींचे लसीकरण दिनांक 8 आणि 10 जानेवारी 2022 रोजी करण्यात येत  आहे.आज रोजी महाविद्यालया मध्ये या लसीकरणाचे उदघाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर साहेब यांच्या हस्ते रोपट्याला पाणी देऊन  करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ.अनिल शित्रे ,उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, सिनेट सदस्य डॉ.गोविंद काळे,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. शशिकला भालकरे ,डॉ.बृहस्पती वाघमारे, प्रा. अनिल पाटील,प्रा. जी. व्ही. पाटील यांची उपस्थिती होती. या लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालय ,तुळजापूर येथून प्रियंका काळुंके, अंजली सोनवणे ,आफ्रिन कोतवाल ,बालाजी गालफाडे आले होते.सर्वांचे या वेळी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन  स्वागत करण्यात आले.या लसीकरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. कुमार खेंदाड,प्रा. अमोद जोशी, प्रा. रमेश इंगळे,प्रा. रामलिंग थोरात,प्रा. गुलाब सय्यद,प्रा. चंद्रकला काठेवाड ,प्रा. अमर भरगंडे तसेच स्वयंसेवक विध्यार्थीनीं प्रीती जाधव, ऋतुजा घोरपडे,दिव्या देशमुख, सोनाली राजमाने, फिस्के, जनार्धन पाटील, सुरेश मुळे, प्रभाकर चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा