Breaking

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

शासकीय व्यसनमुक्ती समितीच्या सदस्य पदी निवड झाले बद्दल विजय खटके यांचा सत्कार


शासकीय व्यसनमुक्ती समितीच्या सदस्य पदी निवड झाले  बद्दल विजय खटके यांचा सत्कार  



     टेंभुर्णी (प्रतिनिधी) तालुका स्तरावरील शासकीय व्यसनमुक्ती समितीच्या सदस्य पदी  स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी मधून हिंदवी स्वराज प्रतिष्ठान टेंभुर्णी संस्थापक अध्यक्ष व्यसन मुक्त युवक संघाचे माढा तालुका अध्यक्ष व माऊली उद्योग समूहाचे मा. श्री विजय दादा खटके- पाटील  यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा टेंभुर्णी येथे सन्मान करण्यात आला त्याच बरोबर याच तालुकास्तरीय व्यसनमुक्ती शासकीय समिती मध्ये पत्रकार प्रतिनिधी म्हणून सदाशिव पवार व सामाजिक कार्यकर्ते प्रतिनिधी मधून शिवसेना टेंभुर्णी अध्यक्ष सुरेश भाऊ लोंढे यांची नियुक्ती करण्यात झाली त्याबद्दल त्याचाही हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे वतीने सत्कार करण्यात आला. तसेच तांबवे येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हणमंत ढवळे यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्रतिनिधी तुकाराम ऊर्फ  बंडु (नाना )ढवळे,  शेतकी अधिकारी विजय खटके चेअरमन अशोक खटके, पत्रकार संतोष वाघमारे, संतोष खटके, डॉ.मनोज काळे,  कैलास माने, सागर माने, भाऊराव माने ,नामदेव व्यवहारे, योगेश पराडे,  सचिन तळेकर ,महादेव करंडे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सचिन पवार गणेश व्यवहारे आणि टेंभुर्णी आणि टेंभुर्णी परिसरातून आलेले हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान चे कार्यकर्ते यांनी केले. यावेळी  बहुतांश  व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा