Breaking

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

समर्थ उद्योग समूह यांच्या वतीने सापटणे (टें) येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.


समर्थ उद्योग समूह यांच्या वतीने सापटणे (टें) येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.


  टेंभुर्णी प्रतिनिधी/
टेंभुर्णी कुर्डूवाडी रोड वर असणाऱ्या  सापटणे (टें) येथे २६ जानेवारी  निमित्त समर्थ उद्योग समूह यांच्या वतीने  शाळेवर  विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला जातो परंतु या दोन वर्षात कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे या वर्षी २६ जानेवारीला खाऊ वाटप करता आला नाही,परंतु शासनाने १ फेब्रवारीला पासून पुन्हा शाळांना परवानगी दिल्याने मंगळवार दी.०८-०२-२०२२ रोजी सकाळी १० वाजता समर्थ उद्योग समूहाचे मालक विठ्ठल भाऊ ढवळे, व माजी उपसभापती तुकाराम  ढवळे  यांच्या मार्गदर्शनाखाली आज सापटणे येथील विठ्ठलराव शिंदे प्रशाला भाग शाळा सापडणे(टें),व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सापटणे, कोरडे वस्ती, हनुमान वाडी या ठिकाणी विजय (भाऊ) जगताप यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
 या वेळी उपस्थित बाळासाहेब विठोबा ढवळे,आमोल साहेबराव ढवळे ग्रा.पं.सदस्य, सरपंच नागनाथ कुबेर, पोलिस पाटील सुग्रीव दादा ढवळे,सुरज कोरडे, माऊली (काका) ढवळे, प्रतिक थोरात, सिताराम तनपुरे, देवा धोत्रे, हनुमंत ढवळे सर, बोराटे गुरूजी जिल्हा परिषद शाळा, ठेंगल गुरूजी, राऊत मॅडम जिल्हा परिषद शिक्षक हनुमानवाडी यांच्या उपस्थितीत खाऊ वाटप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा