पिंपरी*रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*.
रेडा-प्रतिनिधी /शशिकांत सोनटक्के
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती व महाराष्ट्र श्रमशक्ती संघटनेच्या ,तसेच नागरी हक्क सुरक्षा समितीच्या व इतर संघटनेच्या वतीने आज 9 फेब्रुवारी 2022 रोजी पिंपरी येथील महात्मा फुले स्मारक येथे रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती अध्यक्ष मानव कांबळे यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांचे जीवन कार्य बाबत माहिती सांगितली. रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1848 साली झाला व मृत्यू 9 फेब्रुवारी 18 97 रोजी झाला.यांचे मूळ गाव कन्हेरसर हे आहे. त्यांच्या पत्नी गोपिकाबाई होत्या, मुलगा गोपीनाथ होता. तसेच नारायण मेघाजी लोखंडे यांचे कुटुंब गरीब परिस्थितीतून आपली उपजीविका चालवत. त्यांनी रेल्वे खाते, पोस्ट खाते त्याचप्रमाणे मुंबईतील कापड गिरणी भांडारपाल म्हणून काम केले. कामगार संघटना स्थापन केली. असे मानव कांबळे यानी आपल्या भाषणात सांगितले तसेच प्रहार संघटनेचे श्री.निरज कडू यांनी त्यांची माहिती देताना असे सांगितले की रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथे कामगार संघटना स्थापन केली. मुंबईमध्ये भव्य कामगार मेळावा नारायण मेघाजी लोखंडे यांनी घेतला. त्या वेळेस कामगारांना तेरा-चौदा तास काम करावे लागत असे व साप्ताहिक सुट्टी मिळत नसे, त्यामुळे कामाचे तास ठेवून द्यावे व साप्ताहिक सुट्टी मिळावी म्हणून त्या वेळच्या इंग्रज सरकारकडे कामगार नेते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मागणी केली. त्याप्रमाणे इंग्रज सरकारने 1875 साली आयोग नेमला त्यानंतर कामाचे तास ठरले व रविवारची सुट्टी मंजुर झाली सदर प्रसंगी श्री.प्रताप गुरव प्रदेश उपाध्यक्ष बारा बलुतेदार संघ,श्री.आनंदा कुदळे अध्यक्ष ओबीसी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र श्रमशक्ती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री महेश कनकुरे , श्री.विशाल जाधव युवा प्रदेश अध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ, श्री.सोमनाथ शेळके पुणे जिल्हा अध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ. नगरसेवक संतोष लोंढे,, संतोष जोगदंड, गौतम गजभार प्रहार संघटनेचे नीरज कडू ,महेश कनकुरे , विजय तापकीर ,सुरेश गायकवाड ,प्रल्हाद कांबळे ,महेश भागवत ओंकार भागवत, राहुल कुदळे, संदीप चव्हाण , कॉम्रेड अनिल रोहम इत्यादी कार्यकर्ते हजर होते सूत्रसंचालन संतोष जोगदंड यांनी केले. आनंदा कुदळे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा