Breaking

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांचा स्मृतिदिन सुपे येथे साजरा*


*स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांचा स्मृतिदिन सुपे येथे साजरा* 


सुपे प्रतिनिधी/सागर चांदगुडे

 हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा स्मृतीदिन व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती यानिमित्ताने दोन्ही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून प्रतिमांचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन  प्राजक्ता मतिमंद निवासी शाळा सुपे या ठिकाणी करण्यात आले होते यानिमित्ताने याप्रसंगी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, बारामती तालुका, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा, राजे प्रतिष्ठान बारामती, मयुरेश्वर प्रतिष्ठान सुपे परगणा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, सुपे परगणा.  ग्रामस्थां कडुन त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री निलेश पानसरे, सहअध्यक्ष शिवश्री अतुल ढम,  महेश चांदगुडे सर, मुनिर डफेडार ग्रामपंचायत सदस्य सुपे, फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष गणेश खैरे जीवन साधना फाउंडेशन अध्यक्ष जयराम आप्पा कुंभार, एकल शिक्षक मंच मचाले सर सुपे ग्रामस्थ सर्व संघटनांचे पदाधिकारी व सुपे परगण्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चांदगुडे सर यांनी केले व माध्यमातुन शहाजी राजे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम करण्यात आले . भिमा वाघचौरे याने गारद दिली,आभार प्रदर्शन जीवन साधना फाउंडेशनचे अध्यक्ष जयराम अप्पा कुंभार यांनी शहाजीराजे विषयी माहिती देऊन आभार मानले. यावेळी कोरोना सुरक्षाविषयक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा