Breaking

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

स्वातंत्र्यसैनिकांचा शिलालेख व स्व.विठ्ठलभाऊ शिंदे यांच्या पुतळ्याचे राजकारण पेटले ▪️पोलीस बंदोबस्तात 'जनशक्ती'ने स्वातंत्र्यसैनिकांच्या शिलालेखाचा केला जलाभिषेक▪️स्व. विठ्ठलभाऊ शिंदे यांच्या पुतळ्याला विरोधच


▪️ स्वातंत्र्यसैनिकांचा शिलालेख व स्व.विठ्ठलभाऊ शिंदे यांच्या पुतळ्याचे राजकारण पेटले 


▪️पोलीस बंदोबस्तात 'जनशक्ती'ने स्वातंत्र्यसैनिकांच्या शिलालेखाचा केला जलाभिषेक


▪️स्व. विठ्ठलभाऊ शिंदे यांच्या पुतळ्याला विरोधच 



 माढा/प्रतिनिधी


 माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये शासकीय जागेत आमदारद्वय बबनदादा शिंदे व संजयमामा शिंदे यांचे वडील स्व. विठ्ठलभाऊ शिंदे यांचा पुतळा उभारण्यावरून राजकारण पेटले असून, ज्या ठिकाणी पुतळा उभा करायचा आहे त्या शेजारी स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचा शिलालेख आहे. पुतळ्याचे काम सुरू असल्याने स्वातंत्र्यसैनिकाच्या शिलालेखाचा अवमान झाला यामुळे त्याचा दुग्धाभिषेक करणार असल्याचे जनशक्ती ने सांगितले होते. मात्र मोठ्या पोलिस बंदोबस्तात या ठिकाणी जलाभिषेक करून पूजा करण्यात आली.

 याबाबत वृत्त असे की, पंचायत समिती आवारात नियोजित स्व.विठ्ठलभाऊ शिंदे यांच्या पुतळ्यावरून वादंग उठला आहे. यासाठी जनशक्ती संघटनेने विरोध दर्शविला आहे. पंचायत समितीच्या आवारात स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र विठोबा कोळे माढा, पांडुरंग आबाजी कुलकर्णी मोडनिंब, दामोदर पांडुरंग भोसले कुर्डू, नामदेव दत्तात्रय गुंड कुर्डूवाडी, भगवान तुकाराम जंजाळ, गणपत सखाराम शेंडे, आनंत बापुजी भंगली यांचा नामोल्लेख असलेला शिलालेख आहे. मात्र पुतळा अधिक उंचीचा झाला तर स्वातंत्र्यसैनिकांच्या शिलालेखाचा तो अवमान आहे. शिवाय पुतळ्याच्या नियोजित कामामुळे या शिलालेखाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खूपसे पाटील यांनी केला होता. त्यामुळे या शिलालेखाला  दुग्धाभिषेक करणार असल्याचे निवेदन त्यांनी दिले होते.

 दरम्यान, आज सकाळपासूनच पंचायत समिती आवारात कडेकोट पोलिस बंदोबस्त लागला होता. अतुल खुपसे व कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. दुधामुळे शिलालेख आणखीनच जीर्ण होईल व पडेल असे सांगण्यात आले. त्यामुळे दुधाऐवजी पाणी वापरून तो शिलालेख स्वच्छ करून त्याची पूजा करणार असल्याचे त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात खूपसे पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या त्या शिलालेखाला जलाभिषेक करून पूजा केली.

 यावेळी जिल्हा प्रमुख नितीन जगताप, तालुका प्रमुख गणेश गोडिगिरे, मोहन गायकवाड, सुरज धोत्रे, शरद एकड, बुवा साहेब नरसाळे, कुंदन वजाळे, आर.पी.आय. युवक कुर्डुवाडी शहर अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, जोतिराम घाडगेयांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

▪️ सोबत फोटो पाठवला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा