Breaking

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

नवाब मलिक यांच्या अटकेचा नळदुर्ग शहर महाविकास आघाडी कडून निषेध



नवाब मलिक यांच्या अटकेचा नळदुर्ग शहर महाविकास आघाडी कडून निषेध


प्रतिनिधी:- अजित चव्हाण

नळदुर्ग:- महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडी ने अटक केल्यामुळे नळदुर्ग महाविकास आघाडीच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.या निवेदनात असे नमूद केले आहे की, भारत देशामध्ये या घडीला भाजप हा त्यांच्या समर्थक मनुवादी संघटना सत्येत असल्यामुळे सत्येचा गैरवापर करून समजामध्ये जातीयवाद व तसेच समाजात दुरी निर्माण करण्याचा अट्टाहास करत असून केंद्रीय शासकीय यंत्रणा ईडी, सीबीआय, यांचा गैरवापर करत असून बहुजन समाजातील ज्या नेर्तृत्वान व्यक्ती मनुष्यवादी प्रवृत्तीला विरोध करतात व देशामध्ये एकोपा टिकवण्याचा प्रयत्न करतात आशांना जाणीव पूर्वक टार्गेट करून त्याना हताश करण्याचा सुरू असलेला प्रयत्न थांबवण्यासाठी लक्ष द्यावे असे निवेदनात म्हटले आहे.
    यावेळी शहबाज काझी, मुश्ताक कुरेशी, कमलाकर चव्हाण, बशीर शेख, सरदारसिंग ठाकूर, शफी शेख, सचिन डुकरे, ताजोदीन शेख, शिवाजी मोरे, आंनद पुदाले,कल्पना गायकवाड, सुभद्रा मुळे, गौस कुरेशी, इरफान शेख, इमाम शेख, आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा