राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांचे उपस्थितीत पिंपळनेर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा - आ.बबनराव शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी। मुकुंद रामदासी
राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष .ना.श्री.जयंतराव पाटील यांचे उपस्थितीत सोमवार दिनांक २१ रोजी दुपारी २ वा स्नेहल मंगल कार्यालय पिंपळनेर येथे माढा विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आहे अशी माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा.ना.जयंतराव पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रील सोलापूर व पूणे जिल्ह्याचा परिवार संवाद दि.21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी,2022 या दरम्यान होणार असून सोमवार दि.21 रोजी दुपारी 2:00 वा. स्नेहल मंगल कार्यालय,पिंपळनेर ता.माढा येथे मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले कि, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपले राज्याचे जलसंपदामंत्री व प्रदेशाध्यक्ष .ना.जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा मेळावा शासनाने घालून दिलेल्या नियम व सोशल डिस्टींगशनचे पालन करुन आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या मेळाव्यासाठी माढा ,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील, माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थितीत राहवे असे आवाहन आ.बबनराव शिंदे यांनी केले आहे.
******************************************
*******Advt**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा