Breaking

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

स्वराज्य ग्रुप अकलूज चौक च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी


स्वराज्य ग्रुप अकलूज चौक च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी


AJ 24 Taas News प्रतिनिधी- भारत जगताप


स्वराज्य ग्रुप,अकलूज चौक,टेंभुर्णी येथे शिवजयंतीचे आयोजन रावसाहेब नाना मित्र मंडळ व स्वराज्य ग्रुप संस्थापक अध्यक्ष प्रशांत देशमुख यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मधुकर देशमुख हे होते.

       यावेळी तालुका पंचायत समिती सदस्य वैभव कुटे,समाजसेवक गोरख  देशमुख,टेंभुर्णीचे मा.पोलीस पाटील कल्याण पाटील,ग्रामपंचायत सदस्य शैलेश ओहळ,प्रकाश पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
.
            यावेळी ट्विंकल स्टार येथे शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा शिंदे दुतिय क्रमांक आदिती शिंदे व तृतीय क्रमांक समृद्धी इंदलकर यांचाही ट्रॉफी देऊन मान सन्मान करण्यात आला ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी ऋतुजा शिंदे,आदिती शिंदे, समृद्धी इंदलकर आपले विचार शिवकालीन समाज आणि आत्ताचा समाज यावर आपले विचार व्यक्त केले.आदित्य बीके यांनी शिवरायांवर उत्कृष्ट पोवाडा गाऊन चौकातील सर्वांची मने जिंकून घेतली.तसेच चार वर्षाची लहान चिमुकले अनन्या नितीन देशमुख हिने आपल्या गोड आवाजात शिवरायांची मुद्रा सर्वांपुढे मांडली. त्यावेळेस उपस्थितांकडून भरपूर टाळ्या मिळाल्या व चिमुकलीचे कौतुक केले.बिबीशन देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.मुलांनी सादर केलेले लेझीम नृत्य,काठीलाठीसारखे मर्दानी खेळ हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी जय शिवाजी,जय जिजाऊ तुमचे आमचे नाते काय,जय भवानी जय शिवराय आशा जय घोषाने संपुर्ण टेंभुर्णी दणाणून गेली होती.

             यावेळी मधुकर देशमुख, वैभव कुटे,गोरख देशमुख,कल्याण पाटील,शैलेश ओहळ,बापु शिंदे, जयवंत पोळ,प्रकाश पाटील,प्रशांत सोनवणे,नागनाथ वाघमारे,संभाजी वाघे,सुरेश कुटे,विष्णू पेठकर,नागेश खटके, टायगर ग्रुपचे लखन माने,विजय कोकाटे, राहुल टिपाले,अविनाश भोसले,शरद मेथा,सतीश खुळे,अजय ओहळ, निलेश मिसाळ,संतोष कोडलिंगे, आप्पा हवलदार, केंद्र प्रमुख बाळासाहेब काशीद, चंद्रकांत शिंदे, विकास लोंढे,अनिल माने बाळासाहेब बारवे,अमोल देशमुख, हनुमंत देशमुख,अमोल मदने, आप्पा हवालदार,सोमनाथ खरसांडे, ट्विंकल स्टारच्या प्रिन्सिपल रेखा गाडेकर,सचिव अर्चना गाडेकर,मनीषा सोनवणे,ऋतुजा हामकर,मोहिनी काळे,अनुराधा देशमुख,कोमल देशमुख, सुकन्या देशमुख,कल्पना घाडगे,वर्षा शेळके, शिवकन्या शिलवंत,प्रिती देशमुख, ऐश्वर्या शेळके,दिव्या घाडगे,अशा महिला वर्गासह अनेक जण उपस्थित होते.
        कार्यक्रम पार पाडण्यासाठी रत्नदीप आटकळे,अमित पाटील, दादासाहेब जवळगे,आकाश सुतार, स्वप्निल शेळके,राहुल बारबोले,हर्षल कास्वेद,संदीप आटकळे,गौरव देशमुख,अमित देशमुख,जयवंत देशमुख,शिवराज देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

         स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने  शिवजन्मोत्सव सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. रावसाहेब नाना मित्र मंडळ व स्वराज्य ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.प्रास्ताविक अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन राजू पाटील यांनी केले.उपस्थित सर्वांचे आभार गोरखबप्पा यांनी मानले.

**************Advt*************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा