*शहीद जवान मच्छिंद्र वारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना वही वाटप*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
शहीद जवान स्व मच्छिंद्र संभाजी वारे यांच्या 33व्या तसेच स्व नवनाथ संभाजी वारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जातेगाव येथील प्राथमिक शाळेत वारे परिवाराकडून विद्यार्थ्यांना वहिवाटप करण्यात आले.स्व मच्छिंद्र वारे यांचे चिरंजीव विनोद वारे व प्रमोद वारे,विरपत्नी श्रीमती विमल ताई वारे व परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गावातील माजी सैनिक प्रकाश पाटील,दादा पाटील आदींच्या हस्ते तसेच गावातील विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सरपंच छगन ससाणे,मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दीपक शिंदे,पोलिस पाटील गोरख धुमाळ,सुधीर शिंदे,भाऊसाहेब शिंदे,सुनील शिंदे,राहुल शिंदे,कल्याण शिंदे,ज्ञानदेव वारे,लालासाहेब वारे,रमेश पाटील, दादासाहेब वारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विनोद मच्छिंद्र वारे म्हणाले की, वडीलांच्या पश्चात ग्रामस्थांनी आमच्या कुटुंबाला आधार दिला. त्यामुळेच आम्ही यशस्वीपणे वाटचाल करू शकलो. देशाच्या सीमेवर लढणारी जवनांच्याप्रति अशीच सदभावना समाजाने दाखवायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना माजी सैनिक प्रकाश पाटील यांनी आपले रोमहर्षक प्रसंग उपस्थितांसमोर सांगत नवीन पिढीने जास्तीत जास्त प्रमाणावर सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. शाळेचे मुख्याध्यापक पोपटराव थोरात गुरुजी यांनी वारे परिवाराच्या या उपक्रमाचे स्वागत करत याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक ,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. प्रमोद वारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा