Breaking

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

.शालेय पोषण आहाराची मूल्यांकन तपासणी


शालेय पोषण आहाराची मूल्यांकन तपासणी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

लोहा: शालेय पोषण आहार योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यमापन महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत दिनांक ०५- फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरा केंद्र सुगाव येथे भेट देऊन शालेय पोषण आहाराच्या सर्व अभिलेखांची तपासणी करण्यात आली.

शालेय पोषण आहार मूल्यांकन तपासणी पथकाकडून शाळेतील शालेय पोषण आहार प्रपत्र अबक रजिस्टर,चव रजिस्टर कँसबुक, स्वयंपाक तथा मदतनीस यांचे ठराव,करारनामा खुल्ला तांदूळ धान्य वाटप रजिस्टर शालेय पोषण आहार समिती रजिस्टर याच बरोबर पथक प्रमुखांनी शाळेतील किचन रूम शाळेतील स्वच्छता या सर्व बाबींची तपासणी करून शाळेच्या कामाबद्दल तपासणी प्रमुखांनी समाधान व्यक्त केले.

यासाठी प्रतिनिधी म्हणून ए.एफ.सी समन्वयक श्री संदीप गोविंदा गरडे,गजानन शेळके संबंधित केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.बी.जी कापसे शालेय पोषण आहार विभाग प्रमुख पंचायत समिती लोहा श्री.सिद्धार्थ एस सोनकांबळे कंधार शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक श्री. पांचाळ ए.एन आदींचे सहकार्य लाभले.

यावेळी उमरा जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक व्ही.व्ही.अमनवाड जि.प.प्रा शाळा रामजी आंबेडकर नगर शाळेचे मुख्याध्यापक श्री.एम.डी सिरसाट,श्री.मेथे,आर.आर वंगलवार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा