Breaking

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर येथे तुळजाभवानी महाविद्यालयात, तालुकास्तरीय शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षक दरबार भरवण्यात आला*


*तुळजापूर येथे तुळजाभवानी महाविद्यालयात, तालुकास्तरीय शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षक दरबार भरवण्यात आला*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद


औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब यांचा तुळजापूर येथे तालुकास्तरीय शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण तालुक्याचा दौरा व तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे शिक्षक दरबार भरवण्यात आला होता. याप्रसंगी
राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक महासंघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तानाजी म्हेत्रे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रभाकर जाधव, जिल्हा सचिव किसन क्षिरसागर, तुळजापूर तालुका अध्यक्ष जीवन उंबरे यांनी शिक्षक आमदार मा. काळे साहेब यांना शिक्षकाच्या विविध अडचणी संदर्भात निवेदन दिले. दिलेल्या निवेदनावर लवकरच कारवाई करू अशी ग्वाही शिक्षक आमदार साहेबांनी दिली.
   त्यावेळी लातूर विभागाचे उपसंचालक गणपतराव मोरे साहेब, उस्मानाबाद जिल्हा डायट चे प्राचार्य बळीराम चौरे साहेब,तुळजापूरचे गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव साहेब तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा