Breaking

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

युवकांनी संतोष (आप्पा)पाटील यांचा आदर्श घ्यावा-संजय पाटील भिमानगरकर संतोष (आप्पा) पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव


युवकांनी संतोष (आप्पा)पाटील यांचा आदर्श घ्यावा-संजय पाटील भिमानगरकर 


संतोष (आप्पा) पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव 


टेंभूर्णी प्रतिनिधी

उजनी टे ता. माढा येथील संतोष (आप्पा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मा. कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी मनोगत व्यक्त केले संतोष (आप्पा) पाटील हे युवकांच्या हृदयातील ताईत झाले असून उजनी टे,रांझणी, भिमानगर,आढेगाव,शिराळ येथील युवकांमधे संतोष पाटील यांची क्रेझ आहे.त्यांच्या कार्याचा तरुण वर्गानी आदर्श घ्यावा. कोणाच्याही मदतीला धावून जाणे व कोणतेही काम तात्काळ पूर्णत्वास लावणे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे संतोष आप्पा पाटील असे मत संजय पाटील यांनी व्यक्त केले.


माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील यांनी आपल्या मनोगतात संतोष पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेला समुदाय त्यांची भविष्यातील वाटचाल योग्य मार्गाने सुरू असून त्यांच्या सामाजिक,राजकीय वाटचालीस माझे सहकार्य असेल असे यावेळी सांगितले.गेली चार वर्षे झाले वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात युवक वर्ग उपस्थित असतो.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका उपाध्यक्ष प्रदीप पाटील, पोलीस पाटील संजय गायकवाड,  सावन ॲग्रो इंडस्ट्रीजचे  चेअरमन सतीश थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मा. सभापती संजय पाटील भिमानगरकर,राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील,उजनी चे  मा.सरपंच संतोष मेटे-पाटील, रांजणीचे सरपंच पांडुरंग माने, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस संघटक दादासाहेब भांगे,पै गणेश पाटील,पै.रमेश पाटील,प्रशांत पाटील,नितीन मस्के,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका विद्यार्थी अध्यक्ष मेघराज पाटील,धवल पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस संतोष चव्हाण,रांजणी चे तंटामुक्ती अध्यक्ष राहुल चौगुले,अतुल चौगुले,राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका सरचिटणीस धनंजय तांबिले,ॲड.मंगेश देशमुख,सावन इंडस्ट्रीजचे चेअरमन सतीश थोरात,बाळासाहेब पाटील,प्रदीपराव पाटील,व आढेगाव,रांजणी,भिमानगर,
उजनीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा