धर्मवीर संभाजी शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनील गव्हाणे यांची निवड
प्रतिनिधी:-अजित चव्हाण
नळदुर्ग:- धर्मवीर संभाजी शिवजन्मोत्सव समिती गवळी गल्ली नळदुर्ग च्या अध्यक्षपदी सुनिल गव्हाणे यांची निवड झाली असून उपाध्यक्ष म्हणून सनी भूमकर, राहुल जाधव,तर सचिव पदी सुरज चव्हाण यांची निवड झाली प्रथम वर्षीच ही शिवजयंती साजरी करण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून त्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली ही बैठक नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न पडली यावेळी उमेश जाधव, धनाजी किल्लेदार, केदार स्वामी, मोनिश जाधव, संकेत स्वामी, सनी सुरवसे आदीजन उपस्थित होते शिवजयंती करण्याचा यावर्षी पहिलाच वर्ष असून सरकारने घालून दिलेल्या कोरोनाचे उल्लंघन न करता १७ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिश्वर मूर्ती ची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच १८ तारखेला रात्री १२ वाजता बाल शिवाजी जन्मोत्सव करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा