Breaking

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

प्रहार गणेशोत्सव मंडळाकडून शिराळ टें येथे सभामंडपाचे लोकार्पण.*



*प्रहार गणेशोत्सव मंडळाकडून  शिराळ टें येथे सभामंडपाचे लोकार्पण.*



टेंभुर्णी प्रतिनिधी/ शिराळ टे पवार वस्ती ता. माढा येथे प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील व सुरली गावचे सरपंच सुरेश दादा पवार यांच्या प्रयत्नातून
प्रहार गणेशोत्सव मंडळाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाच लाख रुपये खर्चून उभा केला शेतकरी सभामंडप यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पडत्या पावसातही आपला शेतमाल डाळिंब असेल पिरू असेल किंवा इतर कोणताही शेतमाल या शेडमध्ये पॅकिंग करून मार्केटमध्ये पाठवता येईल


याचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे याआधीही शिराळ टे पवार वस्ती येथील गणेश मंडळाने आज पर्यंत मिरवणुका टाळून रस्त्याचे कामे असतील किंवा शाळा डिजिटल करण्यासाठी केलेली मदत असेल असे अनेक समाजोपयोगी कामे केलेली आहेत अनेक मंडळाच्या पुढे पवार वस्ती येथील मंडळाने एक आदर्श ठेवलेला आहे

हा शेतकरी सभामंडप उभा करण्यासाठी महादेव आबा पवार यांनी जागा दिली तसेच शिराळचे सरपंच बाळासाहेब ढेकणे,धनाजी कादे,दत्ता माळी सचिन लोकरे गजानन सुतार राजेंद्र जगताप सुरली जगन्नाथ काळे ज्योतीराम गोसावी शशिकांत गोसावी अण्णासाहेब महाडिक सुदर्शन कदम नागनाथ लोकरे जयपाल कोठारी चंद्रकांत सोनिग्रा मारुती पवार उत्तरेश्वर यादव अंबादास मुळे यांचे सहकार्य लाभले
या शेतकरी सभामंडपाचे उद्घाटन जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी भारत नाना पाटील प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील,मार्केट कमिटीचे माजी संचालक रामभाऊ पाटील शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी गोटू पाटील 
खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन रामकृष्ण भाऊ काळे , विनोद पाटील प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर पंढरपूर तालुका अध्यक्ष नानासाहेब इंगळे,युनूस पठाण,रयत चे विठ्ठल मस्के, तसेच अकोले सुरली शिराळा येथील ग्रामपंचायत सदस्य अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा