*वृक्षारोपण करून स्वराज मनोज तळेकर याचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा.*
करमाळा, :वांगी नंबर 3 येथील मनोज तळेकर हे प्रत्येक वर्षी आपल्या स्वराज या मुलाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतात. याहीवर्षी त्याचा वाढदिवस प्रत्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर 3 मध्ये जेसीबीने खड्डे घेऊन प्रत्यक्ष झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी ते म्हणाले की ,कोरोना काळामध्ये सर्व जगाने ऑक्सीजन चे महत्व लक्षात घेतले आहे . यामुळे सर्वांना प्राणवायू देणारी आणि सर्वांचे आयुष्य वाचविणारी व वाढविणारी अशी झाडे लावून आपण आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करूया असा संकल्प केला आणि मित्रांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने हा उपक्रम प्रत्यक्ष राबविला, याचा मला मनापासून आनंद होतो आहे.
या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.बी .महाडिक यांनी स्वराजला वाढदिवसानिमित्त गुलाब पुष्प देऊन शुभ आशीर्वाद दिले. या प्रसंगी प्रशालेतील पी .एन .चव्हाण ,एस .डी.मोटे ए.बी .खूपसे, व्ही. एस. सुरवसे ,व्ही बी . होनपारखे,सौ .पी. व्ही.होनपारखे,आर.एच .देशमुख हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील नितीन कांबळे ,जय चोपडे ,अजय कांबळे, राजेश रोकडे, मारुती रोकडे ,औदुंबर वाईकर ,विठ्ठल सावंत ,वैभव कांबळे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पवार यांनी केले तर आभार मनोज तळेकर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा