Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*



*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी या शाळेत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मानीय ऋषिदादा भोसले उपस्थित होते, केंद्रप्रमुख शाळा, व्यवस्थापन समिती, अध्यक्ष, व सर्व सदस्य शाळेतील शिक्षक, अंगणवाडी ताई, गावातील नागरिक यांच्या हस्ते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच शाळेत मोठ्या भिंतीवर किल्ले रायगड व शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे, त्याचे सन्मानपूर्वक लोकार्पण फीत कापून केंद्रप्रमुख शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य शाळेतील शिक्षक अंगणवाडी ताई गावातील नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी केंद्रप्रमुख शिक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या विषयी भाषणे केली तसेच शाळेतील एका विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा केला, विशेष कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थी भित्तिपत्रक तयार करतात त्याचे पण अनावरण करण्यात आले,तसेच ग्रामीण तुळजापूर बीटच्या विस्तार अधिकारी श्रीमती शिंदे मॅडम व गटशिक्षणाधिकारी जाधव साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन या कामासाठी मिळाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा