Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

विठ्ठलवाडी येथे विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी



विठ्ठलवाडी येथे विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी



माढा / प्रतिनिधी- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालय,ग्रामपंचायत कार्यालय,श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती पतसंस्था,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून विविध उपक्रमांनी शिवजयंती मोठ्या आनंदाने उत्साहात साजरी करण्यात आली.


श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती मूर्तीचे पूजन माजी सरपंच बालाजी गव्हाणे व वाचनालयाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच संगीता अनभुले व प्रगतशील शेतकरी अशोक गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन अनिलकुमार अनभुले व सचिव सुशेन भांगे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सुभाष लोखंडे व सहशिक्षिका सुप्रिया ताकभाते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले.

याप्रसंगी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,पतसंस्थेचे उपाध्यक्ष नारायण खांडेकर,पोलीस पाटील बालाजी शेगर,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,सुनील शेंडगे,सचिव नेताजी उबाळे,धनाजी सस्ते,सतीश गुंड, पोपट खैरे,रामलिंग सस्ते,कांतीलाल मुळे,धनाजी शेंडगे,सौदागर गव्हाणे, दत्तात्रय खैरे,कृषी सहाय्यक दयानंद शेंडगे, ग्रामसेविका अनिसा पठाण, अंगणवाडी शिक्षिका वैशाली शेंडगे, इंदुमती कदम,वनिता सस्ते,शिवाजी कोकाटे,सत्यवान शिंगाडे,पांडुरंग खांडेकर,कैलास सस्ते,हनुमंत शिंगाडे, भारत कदम,गोरखनाथ शेगर,अंकुश गवळी,विजय काळे,ग्रंथपाल अमोल जाधव,रवींद्र शेंडगे,अशोक कदम, गणेश दळवी,शिवाजी खरात,दिनकर कदम,मधूकर कदम,भिमराव नागटिळक,सौदागर कोकाटे,युवराज शेगर,नेताजी खैरे,हनुमंत सस्ते, जयराम भिसे,संतोष शिंगाडे यांच्यासह ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळी- विठ्ठलवाडी ता.माढा येथे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती मूर्तीचे पूजन करताना माजी सरपंच बालाजी गव्हाणे, चेअरमन अनिलकुमार अनभुले,अध्यक्ष रामचंद्र भांगे व इतर मान्यवर.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा