*शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळेगांव मध्ये मोफत शालेय साहित्य व खाऊचे वाटप*
माढा तालुक्यातील माळेगांव येथे अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना युवा सामाजिक कार्यकर्ते केशव गायकवाड यांनी मोफत शालेय साहित्य वह्या व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला.
शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचा २१ फेब्रुवारी ला वाढदिवस असून केशव गायकवाड हे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करतात. यावेळी माळेगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी मा.सरपंच धोंडीराम गायकवाड,
वि.का.से.सो.माजी चेअरमन.ज्ञानदेव गायकवाड,जि.प.शाळा माळेगांव व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन गायकवाड,ज्ञानदेव निर्धार,संदिपान गायकवाड केशव गायकवाड सुखदेव गायकवाड, नितीन दादा गायकवाड प्रतिष्ठानचे अभिजीत गायकवाड,गोपीनाथ गायकवाड,बापुराव गायकवाड,अमोल गायकवाड,नागेश लोंढे तसेच शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा