कल्याणी मल्हारी गवळी यांची उजनी टे च्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड
टेंभूर्णी प्रतिनिधी
माढा तालुक्यातील उजनी (टे) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्याणी मल्हारी गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संगीताताई शिवाजी पाटील यांनी गेल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन शुक्रवारी सरपंचपदी विराजमान झाले होत्या. त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. उपसरपंच पदासाठी कल्याणी मल्हारी गवळी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीचे कामकाज सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक आर डी यादव यांनी कामकाज पाहिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी उजनी टे ग्रामपंचायतीवर संपूर्ण पॅनल विजयी झाला होता. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा उजनी (टे) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
रमेश पाटील यांनी नूतन उपसरपंच सौ.कल्याणी गवळी यांना शुभेच्छा दिल्या व महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.
यावेळी मा.कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर, माजी सरपंच संतोष मेटे, रांझनीचे सरपंच पांडुरंग माने, संतोष चव्हाण, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, सतिश पाटील, पंडित पाटील, आनंद पाणबुडे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव पाटील, नागनाथ गवळी, ग्रा. पं.सदस्य विठ्ठल मेटे, गणेश बनसोडे, सुशीला पाटील, अनिता माने,धनाजी मुरकुटे, उत्तरेशोर पाटील, नानासो मेटे, तानाजी मेटे,मल्हारी गवळी,नाना मेटे,लखन गवळी, सुरेश पाणबुडे, निलेश मेटे सह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अहिरे सर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा