Breaking

मंगळवार, १५ मार्च, २०२२

खर्डा च्या लढाईच्या विजय उत्सव श्रीगोंदयात साजरा ,सरसेनापती दौलतराव शिंदे च्या विजयाचा जल्लोष


खर्डा च्या लढाईच्या विजय उत्सव श्रीगोंदयात साजरा ,सरसेनापती दौलतराव शिंदे च्या विजयाचा जल्लोष 



श्रीगोंदा-नितीन रोही,

 शहरातील विजय चौकाचे नाव खर्डा येथे २२७वर्षांपूर्वी १३मार्च १७९५ मध्ये  झालेल्या मराठे आणि निजामाचे युद्धात श्रीगोंदेचे सरसेनापती दौलतराव शिंदे यांच्या विजयाचा जल्लोष म्हणून श्रीगोंदा शहरातील विजय चौकात इतिहासप्रेमी नी विजय उत्सव साजरा केला.नगराध्यक्षा शुभांगी पोटे याच्या हस्ते चौकात फलक अनावरण करण्यात आले.



 १३ मार्च १७९५  रोजी महादजी शिंदे यांचे वारस सरसेनापती दौलतराव शिंदे यांनी खर्डा येथे झालेल्या लढाईत विजय  मिळवला .श्रीगोंदा येथील शिंदे सरकार राजवाडे आहेत त्या जवळ असलेल्या  विजय चौक झेंडा येथे  या लढाईच्या विजयाचे स्मरण म्हणून  विजय चौक झेंडा  येथे नवरात्र उत्सव समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने विजय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष शुभांगीताई पोटे उपगराध्यक्ष संग्राम घोडके नगरसेवक निसारभाई बेपारी, हृदयभाऊ घोडके, अशोक खेंडके,सतिष मखरे, पत्रकार शिवाजी साळुंके, दत्ताजी जगताप, बजरंग दल तालुका प्रमुख कालिदास कोथिंबीर व सर्व  व्यापारी उपस्थित होते. या वेळी झेंडा चौकाचे सुशोभीकरण व्हावे व मराठ्यांच्या शोर्याची आठवण म्हणुन झेंडा चौक येथे भव्य भगव्या ध्वज्याची स्थापना करण्यात यावी अशी संकल्पना सर्व व्यापारी वर्गाच्या वतीने निखिल भागवतआणि नंदकुमार ताडे  यांनी मांडली.

लवकर झेंडा चौकाच्या सुशोभीकरणांस भगवा ध्वज उभारून सुरवात करू असे आश्वासन नगराध्यक्ष ,नगरसेवक  यांनी दिले
 विजय उत्सव यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सदैव कार्यरत असणारे मंडळाचे उपाध्यक्ष मा. धनंजय  खेत्रे, कार्याध्यक्ष मा. प्रशांतजी काळे, मा.नंदकुमार चव्हाण, सुशांत काळे व इतर सर्व सदस्य तसेच मंडळाचे मार्गदर्शक विजय चौक झेंडा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष मा. श्री राजुशेठ नय्यर  शिवसेना नेते नंदकुमार ताडे आदींनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा