Breaking

सोमवार, १४ मार्च, २०२२

महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) समाज संघटनेच्या टेंभुर्णी शहराध्यक्षपदी सतिश लोंढे*



*महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) समाज संघटनेच्या टेंभुर्णी शहराध्यक्षपदी सतिश लोंढे* 


आज टेंभुर्णी येथे माढा तालुका परीट धोबी सेवा मंडळाची बैठक समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये टेंभूर्णी शहराध्यक्षपदी सतिश लोंढे यांची एकमताने निवड करण्यात आली, यावेळी शहर व तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
 यावेळी माढा तालुकाध्यक्ष पदी  वडोलीचे राजेंद्र गायकवाड, युवा तालुकाध्यक्षपदी सिध्देश्वर लोंढे, युवा टेंभुर्णी शहराध्यक्षपदी विकास लोंढे तर लॉन्ड्री संघटनेच्या माढा तालुकाध्यक्षपदी विनायक सूर्यकांत लोंढे यांची निवड करण्यात आली नुतन पदाधिकार्यांना परीट (धोबी) सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष सावता वाघमारे, जिल्हा सचिव दत्तात्रय क्षिरसागर, युवा जिल्हाध्यक्ष राजू ननवरे, राज्य संघटक दयानंद पवार, जेष्ठ मार्गदर्शक बलभीम आप्पा लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र लोंढे, गणेश ननवरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी लोंढे,माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय लोंढे माजी तालुकाध्यक्ष गणेश लोंढे, वडोलीचे माजी सरपंच प्रशांत गायकवाड, किरण लोंढे, प्रकाश लोंढे सर,अरुण लोंढे, आकाश लोंढे, गुरुदेव लोंढे, संदीप लोंढे, संतोष राक्षे, सुदाम लोंढे, सोमनाथ पावसे, अतुल लोंढे, बापू वळसे, महादेव आरगडे, यांचेबरोबर  मोठया संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा