पुण्यनगरी आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे महापालिकेत तैलचित्र ■
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या तत्कालीन नगरसेविका स्वाती लोखंडे , तत्कालीन नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे मनपामध्ये आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे तैलचित्र लावण्यात यावे , असा ठराव पुणे महानगरपालिकेत दिला होता . मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव २०२१ रोजी मंजूर झाला . त्यानुसार काल १४ मार्च २०२१ रोजी दुपारी महापौर यांच्या दालनात तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने आद्यक्रांतिगरू लहुजी साळवे यांचे तैलचित्र सोपवण्यात आले . याप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अशोक लोखंडे , सचिव विकास सातारकर , मातंग समाजाचे नेते शंकर तडाखे , संजय केंदळे , भास्कर नेटके , दीपक वायाळ , संतोष माने , हर्षद शिंदे , राहुल चव्हाण उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा