Breaking

बुधवार, २ मार्च, २०२२

दासगाव मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा १२ जणांवर हल्ला

महाड ; प्रतिनिधी
दासगाव परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यांने  रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर हल्ला करण्याचा उद्योग सुरू केला आहे. गेली दोन दिवसात १२ लोकांवर कुत्र्यांनी हल्ला करत चावा घेतला आहे. 
गेली काही दिवसा पासून दासगाव परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यांने दहशत माजवून ठेवली आहे. हा कुत्रा गाव परिसरात सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत धावत समोर येणाऱ्या व्यक्ती वर सरळ सरळ हल्ला चढवत आहे. गावातील अनेक लोकांनी याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो हाती लागला नाही. कांही घरात देखील शिरण्याचा या कुत्र्याने प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण दासगाव मध्ये एकच चर्चा आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली दोन दिवसात सागर सुरेश चव्हाण ,अमित गणपत मनवे , रमेश महातो , मिथुन कर्जावकर, यशवंत वांद्रे, अनंत सीताराम वाडकर, समीक्षा चंद्रकांत जाधव, दीपक कृष्णा पवार, बेचन बिचू कर्मा, मुश्ताक अब्दूल कादिर अनवारे, गुलजार बावडेकर,  महमद कलाम,सर्व राहणार दासगाव या १२ लोकांना कुत्र्या नि हल्ला करत चावा घेतला आहे. या सर्व लोकांवर दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये उपचार करण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा