Breaking

बुधवार, २ मार्च, २०२२

विकासकामांसाठी निधी द्या- केंद्रिय मंत्री आठवले यांच्याकडे लोहगाव ग्रापं सदस्य गायकवाड यांची निवेदनाद्वारे मागणी



विकासकामांसाठी निधी द्या- केंद्रिय मंत्री आठवले यांच्याकडे लोहगाव ग्रापं सदस्य गायकवाड यांची निवेदनाद्वारे मागणी



           
प्रतिनिधी :- अजित चव्हाण

  तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची  मागणी  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे
ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा गायकवाड 
यांनी केले.
  लोहगाव येथील भिमगर मधील अंतर्गत सिमेंट काॅंक्रेट रस्ते,बुध्दविहार, वाॅल कंपाऊंड, प्रवेशद्वार, स्मशानभूमी या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रापं सदस्य गायक‌वाड यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. 
   यावेळी भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शाम गायकवाड, महिला आघाडीच्याअध्यक्षा निलम  गायकवाड, निलेश गायकवाड, अमित मोरे, मंगेश कांबळे,चंद्रकांत सोनकांबळे, नितीन आहिरे, नेताजी कांबळे, संजय कांबळे, अमित कांबळे,युवराज कांबळे, अदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा