तृतीय पंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन
पिलिव् प्रतिनिधी
अंतरराष्ट्रीय तृतीपंथी ओळख दिनानिमित्त तृतीय पंथीयांसाठी २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ कालावधीत तृतीय पंथीयांसाठी मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त मतदार नोंदणीसाठी तहसील कार्यालय माळशिरस येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जगभरात ३१ मार्च हा दिवस तृतीय पंथी ओळख दीन म्हणून साजरा करण्यात येतो . या निमित्ताने २५४ माळशिरस (अ जा) विधानसभा मतदार संघा मध्ये तृतीय पंथी यांची मतदार नोंदणी करण्यात येणार असून त्याकरिता त्यांच्या कडील कागद पात्रांची कमतरता लक्षात घेऊन मा.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी कागद पत्रा बाबत सवलत देऊ केली आहे .
वय वर्षे १८ पूर्ण असलेले तृतीय पंथी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,रेशन कार्ड, शाळेचा दाखला व जन्म दाखला हे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येईल .
तसेच नवीन नाव नोदणीसाठी दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी रोजी तहसील कार्यालय माळशिरस येथील मीटिंग कार्यालय हॉल मध्ये सकाळी आकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विशेष शिबराचे आयोजन करण्यात आलेले आहे .
तरी अधिकाधिक तृतीय पंथी नागरिकांनी मतदार नोंदणी करावी . असे आवाहन . मा उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज व तहसीलदार माळशिरस यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा