Breaking

मंगळवार, २९ मार्च, २०२२

खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 22 मे रोजी विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन...... आ. बबनदादा शिंदे



खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 
22 मे रोजी विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन......
                                              आ. बबनदादा शिंदे



बेंबळे।प्रतिनिधी।                      

विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव टे व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांचे सहयोगातून रविवार दि.22 मे,2022 रोजी सांय.6.05 वा. चे गोरज शुभमुहूर्तावर मोफत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहीती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.

विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव टे व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांचे सहयोगातून सन 2004 पासून मोफत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. आजअखेर 2000 जोडप्यांचे विवाह संपन्न झालेले आहेत. मागील दोन वर्षे कोव्हीड-19 चे पार्श्वभुमीवर विवाह सोहळ्याचे आयोजन करता आलेले नाही. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर रविवार दि. 22 मे,2022 रोजी सांय.6.05 वा. चे गोरज शुभमुहूर्तावर मोफत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी कारखाना कार्यस्थळावर तसेच कारखान्याचे सर्व शेती विभागीय कार्यालयाचे ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. वधू-वरांचे वय शासनाचे नियमानुसार मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18 पूर्ण असणे आवश्यक आहे माढा, पंढरपूर,माळशिरस व करमाळा  तालुकयातील अशा इच्छुक वधू-वरांनी विवाह नोंदणीसाठी कारखाना व शेती विभागीय कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे नवा आदर्श समाजापुढे निर्माण झालेला  आहे. विवाह सोहळ्यामुळे लग्नकार्यासाठी होणारा अनाठायी खर्च, हुंडा, मानपान यास आळा बसलेला आहे अशी माहीती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.

सोहळ्यामध्ये विवाह करणा-या वधूसाठी शालू,ब्लाऊज पीस,चप्पल,मुंडावळ्या, मनी मंगळसुत्र, हार-तुरे व वरासाठी फेटे, सफारी, बुट, मुंडवळ्या, हार-तुरे मोफत पुरविण्यात येणार आहेत. लग्नसोहळ्यामध्ये विवाह करणा-या पात्र जोडप्यांना शासनाचे शुभमंगल सामुहीक योजनेअंतर्गत रू.10 हजार व कन्यादान योजनेंतर्गत रू.20 हजार अनुदान मिळवून देणेत येणार आहे. तसेच लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहणा-या व-हाडी मंडळीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मोफत विवाह सोहळ्यामध्ये विवाह करू इच्छिणा-या वधू-वरांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन आ.बबनदादा शिंदे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा