Breaking

शनिवार, २६ मार्च, २०२२

तुळजाभवानी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न*



*तुळजाभवानी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न*

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

तुळजापूर,दि.२५ मार्च, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरचे मौजे तिर्थ खुर्द येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी स्वयंसेवकांना आणि गावकऱ्यांना उद्देशुन राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आणि राष्ट्रीय विकासात रासेयोची भूमिका स्पष्ट केली, त्याचबरोबर डॉ बालाजी गुंड यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी कार्यक्रमाधिकारी प्रा.व्ही.एच.चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, यावेळी कनिष्ठ विभागाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.वागदकर एस.पी,प्रा.वसावे एम.जी, तसेच डॉ.सी आर दापके, डॉ.एम.आर आडे,प्रा.बी.जे कुकडे, डॉ.ए.बी.गायकवाड,प्रा.के.एस.कदम,प्रा.एस.एम.कदम, डॉ.एफ.एम.तांबोळी,तर तिर्थ खुर्द येथील उपसरपंच रामदास पवार, महेश मोरे,मयुर जाधव, काशिनाथ दांगट, हनुमंत जाधव, बालाजी जमदाडे यांचे उत्तम सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे आभार प्रा.एस.सी.सुरवसे यांनी आभार मानले, दि.२५ मार्च ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत शिबिरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा