Breaking

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

श्रीगोंदाशहर बंद ठेऊ नये-मनोहर पोटे..



श्रीगोंदाशहर बंद ठेऊ नये-मनोहर पोटे..




श्रीगोंदा:नितीन रोही,

 नगरसेवक मनोहर पोटे यांच्यावर सतीश बोरुडे हल्ला प्रकरणात होत असलेले आरोप चुकीचे असल्याचे मत  पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या सह सर्व नगरसेवकांनी  केले. शहरातील जनतेला वेठीला धरू नका... गोरगरीब, लहान दुकानदार, व्यापारी यांचे मोठे नुकसान होईल..! ज्या घटनेमुळे हे घडले आहे. त्या सतीश बोरुडे हल्ला प्रकरणाचा आम्ही सर्व निषेध करतो. मात्र, सतीश वर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी घेण्यात येणारे आंदोलन थांबवावे.. शहरातील जनतेला विनाकरण वेठीला धरू नका...! असे आवाहन यावेळी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या अध्यक्षांनी व नगरसेवकांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हंटले.

पत्रकार बांधवांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना नगरसेवक मनोहर दादा पोटे यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी म्हंटले माझ्यावर खुनाचा कट रचला वगैरे आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप करणाऱ्यांनी कायदेशीर मार्गाने जावे. जर, मी दोषी असलो.? तर मि शिक्षा भोगायला तयार आहे. 

सदर घटनास्थळी मारहाण करणाऱ्या व्यक्ती ने माझे नाव घेतले. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या पैकी कोणी जर आरोप केले. तर, मी शिक्षा भोगायला तयार आहे. असे पोटेनी सांगितले.

कोणत्याही घटनेचा विपर्यास करून गाव बंद करणे हे चुकीचे आहे. अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज करून पालिका प्रशासनाच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांना तासन्तास ताटकळत धरणेही चुकीचे आहे. दोन वर्षापूर्वी नगरपालिकेच्या नियंत्रणात झालेल्या यात्रा उत्साहात टिळक भोस आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट दराबाबत तक्रारी केल्या होत्या. पण, यावर्षी झालेल्या यात्रा उत्सवात टिळक भोस व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ब्र शब्दही काढला नाही, तुमचं मिटलं तर जमतयं, तुमचं मिटलं नाही, तर वातावरण पेटवता तुम्ही तांदळीचे रहिवाशी असताना, श्रीगोंदा शहरात जातीवाद निर्माण करण्याचे पाप करु नका,असे पोटे यांनी सांगितले.

दूध भेसळीबाबत पत्रकारांनी पोटे ना विचारले असता, कोर्टाने मला त्या प्रकरणात निर्दोष ठरवले आहे. आजही कोणाला त्याबाबत शंका असली.? तर कोर्टाचा निर्णय ते पाहू शकतात.

आमचे नगराध्यक्षपद घालवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केले गेले. काही दिवसांपूर्वी तिथीनुसार झालेल्या शिवजयंतीला ही सतीश बोरुडे सह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. मात्र आम्ही रोष धरला नाही.

माझ्यावर आरोप करणाऱ्या टिळक चा प्रपंच इथून मागे कशावर चालत होता.? दारू विकणार्‍या टिळक भोसने नीतिमत्ता आणि समाजसेवेच्या गोष्टी करू नये..! तुमच्याकडे चार चाकी गाडी.. त्या गाडीत डिझेल... कडक पेहराव.. कुठून.? तुमचे उत्पन्न आणि तुमचा पगार किती..? जरा एकदा सर्वांना कळू द्या..! असा सवाल मनोहर दादा पोटे यांनी पत्रकार परिषदे मार्फत टिळक भोस यांना केला.

माझ्या विरोधात तक्रारी करा, मला शासन करा, न्यायपालिकेत  उभा करा, लढाई कायद्याने लढा परंतु, श्रीगोंदा शहराच्या जनतेला छळू नका.. शहर बंद ठेवण्याचा निर्णय टिळक भोस यांनी घेऊ नये.. त्या फिर्यादीने गुन्हा मागे घेतला असतांना, श्रीगोंदा शहरातील जनतेला विनाकारण त्रास देणे थांबवा..! असे मत सर्वानुमते मनोहरदादा पोटे यांनी व्यक्त केले..

यावेळी  नगराध्यक्षा सौ.शुभांगी ताई पोटे, उपनगराध्यक्ष संग्राम घोडके, अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस, प्रशांत गोरे, सतीश मखरे, बापूशेठ गोरे, रमेश लाढाणे, गणेश भोस उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा