उमरा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी चेतन पाटील सिरसाट यांची बिनविरोध निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरा केंद्र सुगाव ता.लोहा येथे दि.8 रोजी शाळा व्यवस्थापन समितीसाठी पालक सभा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये सर्वानुमते किशन उर्फ चेतन पाटील सिरसाट यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.सभेला केंद्रप्रमुख बी.जी.कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती कार्य व रचना या बाबत मुख्याध्यापक व्ही.व्ही.आमनवाड यांनी उपस्थितांना माहिती सांगितली.त्यानंतर पालकाकडून सदस्याची निवड करण्यात आली.यात अध्यक्षपदी किशन उर्फ चेतन सुभाषराव पाटील सिरसाट उपाध्यक्षपदी सौ.सुरेखा प्रल्हाद शिंदे तर सदस्य म्हणून सौ.ज्योती निळकंठ सिरसाट,सौ. गंगासागर ज्ञानेश्वर मुरुड ,सौ.प्रियंका सोनटक्के, सौ.अणिता माधव जाधव ,पिराजी किशन ढगे ,मरीबा मोतीराम जाधव,पांडुरंग बापुराव पवार, व शिक्षण तज्ञ उमरावसिंह गोविंदसिंह राठोड,शिक्षक प्रतिनिधी आर.आर.वंगलवार सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक व्ही.व्ही.आमनवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शाळेच्या वतीने सुगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक बी.जी.कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती पुनर्गठीत करण्यात आली.यावेळी सचिन सिरसाट,कोंडीबा तुंबरफळे,अविनाश सिरसाट,पवन सिरसाट,रामेश्वर सिरसाट,शशिकांत सिरसाट,निळकंठ सिरसाट,माधव शिंदे,आनंद पांचाळ बालाजी जाधव,यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक विद्यार्थी उपस्थित होते.एम.जी.मेथे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा