अनधिकृत खैराची वाहतूक करणारा ट्रक वन खात्याच्या ताब्यात
महाड वन विभागाची मोठी कारवाई ५ लाखाचा ट्रक आणि लाखो रुपयांचा माळ जप्त
महाड : प्रतिनिधी
रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महाड वन विभागाने गुजरात ते चिपळूण सावर्डे जाणाऱ्या एका ट्रक ची महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्या जवळ चौकशी केली असता त्यामध्ये विना परवाना खैराची वाहतूक होत असल्याचे समोर आले. महाड वन विभागाचे अधिकारी राकेश साहू यांनी ट्रक चालक मालक याला तर ट्रक आणि त्यातील खैराची लाकडे जप्त केली आहेत.
रविवारी महाड वनविभागाचे वनक्षेत्रपाल राकेश साहू यांना मिळालेल्या माहिती नुसार मुंबई गोवा महामार्गावरून विनापरवाना खैराच्या लाकडांची वाहतूक होत आहे. त्यांनी महाड तालुक्यातीळ मुंबई गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्या जवळ कर्मचाऱ्यां समवेत सापळा रचला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास डी. एन. ०९ एन ९३४५ गुजरात सिल्वासा ते चिपळूण सावर्डे जाणारा ट्रक चेक केला असता त्या मध्ये विना परवाना असलेल्या खैराच्या लाकडाची वाहतूक होत असल्याचे उघड झाले. ट्रक चालक मालक शांताराम खंडू पाटील, रा. सिल्वासा गुजरात याला ताब्यात घेतले. वन विभागाने ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतेच कागदपत्र नसल्याचे उघड झाले.
हा माल गुजरात सिल्वासा मध्ये भरलेला असून चिपळूण सावर्डे येथे सचिन कात मिल याच्या कडे पोहोच करायचा होता अशी माहिती ट्रक चालकाने वन विभागाला दिली. वन विभागाने या ट्रक मध्ये असलेले लाखो रुपये किमतीचे ३९५ खैराचे तुकडे सापडले. माला सोबत ५ लाख किमतीचा ट्रक देखील जप्त केला आहे. पुढील चौकशी सुरू असून विना परवाना माल वाहतूक करत असल्या प्रकरणी वाहन चालक मालक शांताराम पाटील यांच्या विरोधात भारतीय वन आधी नियम १९२७ चे कलम ३६(१) फ /४१-४२व मुंबई अधिनियम १९४२ कलम ६६ चे उलंघन केल्या प्रकरणी त्यांना आणि ट्रक ताब्यात घेतले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा