Breaking

सोमवार, १४ मार्च, २०२२

सोहम कुटे यांची राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत निवड*



*सोहम कुटे यांची राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत निवड*



टेंभुर्णी प्रतिनिधी/दिनांक 13 मार्च 2022 
 सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन च्या मान्यतेने तसेच सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या सोलापूर जिल्हा जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत एकूण 97 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये वय वर्ष दहा वयोगटांमध्ये सलग पाच फेऱ्या विजय होत *सोहम सुनिल कुटे* यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 


त्याच्या या उज्जवल यशाबद्दल टेंभुर्णी गावचे सरपंच श्री.प्रमोद कुटे, त्याचबरोबर त्याचे शिक्षक आणि मित्रपरिवार यांनी खूप खूप अभिनंदन केले आहे. व कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा