मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त पाणपोईचे उद्घाटन (पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक श्री.सिद्धेश्वर गोरे यांच्या हस्ते उद्घाटन)
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन, व वाढत्या उन्हामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी,कारण या परिसरात अनेक बँका, व्यापारी पेठ, प्रवासी यांची मोठी गर्दी असते, म्हणून लोकमंगल बँके शेजारी मनसेच्या वतीने पाणपोई सुरु करण्यात आली असून त्याचे उद्घाटन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.सिद्धयेश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख उपस्थिति पत्रकार प्रा.डॉ. दिपक जगदाळे, पत्रकार अजित चव्हाण यांची होती, यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, जनहित कक्ष व विधी वि.ता.अध्यक्ष अँड.मतीन बाडेवाले,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, शहर संघटक रवि राठोड, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा