तलाठी प्रिती काळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सन्मान
बेंबळे। प्रतिनिधी फोटो
जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूरच्या वतीने कोव्हिड १९ या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी व कोविड लसीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी वेणेगाव-तांबवे टें- अकोले बुद्रुक (ता. माढा) या तिन्ही गावचा समाईक कार्यभार सांभाळणाऱ्या येथील तलाठी प्रिती लक्ष्मीकांत काळे यांचा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपूते व निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. याबद्दल कुर्डूवाडीच्या प्रांताधिकारी ज्योती कदम, माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण, मंडल अधिकारी यांनी तलाठी प्रिती काळे यांचे अभिनंदन केले आहे तसेच महसूल विभागीय स्तरातूनही प्रिती काळे यांचे कौतुक होत आहे.
फोटो ओळ - तलाठी प्रिती काळे यांचा सन्मान करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपूते व उपजिल्हाधिकारी शमा पवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा