कन्हेरगांव ग्रामस्थांच्यावतीने रणजितसिंह शिंदे यांचा सत्कार.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी माढा तालुक्याचे युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य तथा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजितसिंह भैय्या शिंदे यांची निवड झाल्याबद्दल कन्हेरगांव तालुका माढा येथील ग्रामस्थांच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला . विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी डोके , माजी सरपंच लिंबाजी मोरे , सोसायटीचे चेअरमन नागेश मोरे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या . कन्हेरगांव चे माजी उपसरपंच तथा माढा तालुका शिक्षण सल्लागार समितीचे सदस्य धनंजय मोरे व ज्येष्ठ नेते भारत पाटील यांच्या हस्ते नुतन चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे,भारत आप्पा पाटील, सोसायटीचे संचालक गणेश माने , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव भरगंडे , राजेंद्र केदार , माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आण्णासाहेब मोरे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ लोखंडे , शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब डोके, बापूसाहेब शिंदे , प्रवीण शिंदे गुरुजी , बाबु गिरी गोसावी , संतोष कांबळे , रमेश परबत , मिलिंद भोसले ,भास्कर आप्पा डोके , महादेव डोके , अशोक काकडे , विलास लांडगे , बाळासाहेब संदिपान डोके , नितीन मराठे , आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा