Breaking

सोमवार, १४ मार्च, २०२२

जि.प.प्रा.शा.वसंतनगर,नळदुर्ग शाळेत स्वयंशासन दिन संपन्न



जि.प.प्रा.शा.वसंतनगर,नळदुर्ग शाळेत स्वयंशासन दिन संपन्न



AJ 24 Taas News Maharastra-प्रतिनिधी:- अजित चव्हाण


नळदुर्ग:-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर,नळदुर्ग येथे स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यामध्ये इयत्ता 5 वी. वर्गातील विद्यार्थ्यांनी आज दिवसभर शाळा चालवून मुलांना अध्यापन केले. दुपारच्या सत्रात मुलांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रमुख उपस्थिती शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रवी माणिक राठोड शा.व्य.स.सदस्या सौ.ज्योती पवार सौ.सविता चव्हाण आणि इतर पालक समारोप प्रसंगी मुलामुलींनी स्वामी विवेकानंद,सरदार वल्लभभाई पटेल,अण्णाभाऊ साठे,स्वामी रामानंद तिर्थ,व संविधान प्रदान करत असलेले डॉ.राजेंद्र प्रसाद,पंडीत जवाहरलाल नेहरु आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा शाळेला भेट दिले.व आपल्या भावना  मनोगतातून व्यक्त केले.तसेच शिक्षक,शिक्षिका,व मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक यांनीही आपले अनुभव व्यक्त केले.
  कार्यक्रमाचा समारोप शाळेचे मुख्याध्यापक श्री.आर.आय.औसेकर सर यांनी मार्गदर्शन केले ,तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.बी.टी वायकरश्री.ई.एम.शिरगुरे,श्री.एच.एम.सुरवसे,एस.जी.कुलकर्णी,श्रीमती वाघमारे व्ही.एल.यांनी सहकार्य केले.शेवटी राष्ट्रगान घेऊन समारोप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा