Breaking

सोमवार, ७ मार्च, २०२२

जागर स्त्री उत्सवाचा; विशेष महिला आरोग्य शिबिराचे आयोजन


जागर स्त्री उत्सवाचा; विशेष महिला आरोग्य शिबिराचे आयोजन


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट : आजादी का अमृत महोत्सव व जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 2 ते 8 मार्च दरम्यान पंचायत समिती सभागृहात महिला सप्ताह उत्सव स्त्री जाणिवांचा विविध उपक्रमांच्या आयोजनाने साजरा करण्यात आला.जागर स्त्री उत्सवाचा या कार्यक्रमानिमित्त विषेश महिला आरोग्य शिबिराचे आयोजन पंचायत समिती किनवट येथे करण्यात आले.या शिबिरात एच.एल.एल महालॅब्स द्वारे महिलांच्या रक्तातील तपासण्या करण्यात आल्या.शिबिरात महीलांची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा. कीर्तीकिरण पुजार, गटविकास अधिकारी सुभाष धनवे गटशिक्षणाधिकारी, अनिल महामुने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.


यावेळी आरोग्य विभागातील विषेश कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहायक जिल्हाधिकाऱ्याचा हस्ते सत्कार करण्यात आला.यात डॉ.भाग्यश्री वाघमारे वैद्यकीय अधिकारी राजगड,डॉ.रत्नमाला सिडाम समुदाय आरोग्य अधिकारी शनिवारपेठ,विठ्ठल श्रीमनवार विस्तार अधिकारी (आरोग्य) पं.स.किनवट,श्रीमती चव्हाण आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती.बनसोड आरोग्य सहयीका बोधडी,श्रीमती.काळसरे आरोग्य सेविका मलकापूर,श्रीमती.लांडगे औषध निर्माण अधिकारी राजगड, श्रीमती.रेणुका कणाके आशा पिंपळगाव ,यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 तसेच दैनिक लोकमतचे पत्रकार गोकुळ भवरे व सेवाअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम एम.डी.साठी निवड झाल्याबद्दल डॉ.धर्मराज पवार वैद्यकीय अधिकारी बोधडी यांचा सहायक जिल्हाधिकारी मा.किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संजय मुरमुरे तालुका आरोग्य अधिकारी यांनी व आभार प्रदर्शन श्री.भुरे साहेब आरोग्य सहायक दहेली तांडा यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशा समन्वयक जनार्धन काकडे,सतिष गुरव,प्रकाश शिरसाट,श्री.बोंबले,व्यंकट तोटावर,रामप्रसाद सरपल्लीवर,शुभम कल्हाळे,सचिन कांबळे,नरेश बंडेवार गिरीधर तोटावर यांनी विषेश परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा