तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील
इंदिरा गांधी आदर्श प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थी स्वयंशासन दिन,व निरोप समारंभ संपन्न.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
इयत्ता १० वी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन घेण्यात आला.स्वयंशासन दिनासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कुमार बनसोडे बळवंत व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून राठोड पायल यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी खूप छान नियोजन केले,तसेच शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी त्यांना खूप चांगले मार्गदर्शन केले.
स्वयंशासन दिन संपल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेचच निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी निरोप संमारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.राठोड सर व प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.कवठे सर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी राठोड कविता विलास व कुमार शेकापुरे सोमनाथ यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपले
विचार व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा