Breaking

रविवार, १३ मार्च, २०२२

संभाजी ब्रिगेडची बैठक नुकतीच नायगाव येथे संभाजी ब्रिगेड ची बैठक संपन्न



संभाजी ब्रिगेडची बैठक नुकतीच नायगाव येथे संभाजी ब्रिगेड ची बैठक संपन्न
या बैठकीत नायगाव विधानसभा उपाध्यक्ष व नायगाव तालुका उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडने गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर व सामाजिक, शैक्षणिक शेतकी व युवकांच्या क्षेत्रात भरीव काम केले आहे. आगामी काळात 100 टक्के समाजकारण 100 टक्के राजकारण करणार आहे असे संभाजी ब्रिगेड चे नायगाव विधानसभा अध्यक्ष श्रीधर पाटील यांनी सांगितले. गाव तिथे कार्यकर्ता, गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा गरजेचा आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाज करणे हेच खरे आरक्षण असल्याचे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष हणमंत पाटील कल्याण सांगितले.
यावेळी संभाजी ब्रिगेड नायगाव विधानसभा उपाध्यक्ष पदी
गोपाल देविदासराव डोईफोडे व नायगाव तालुका उपाध्यक्ष पदी विकास शिवाजीराव डोईफोडे यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत पाटील 
नायगाव विधानसभा अध्यक्ष श्रीधर पाटील हंबर्डे
तालुका अध्यक्ष हनुमंत पाटील कल्याण
उपस्थित राहून त्यांना पुढील कार्यास शिव शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा