Breaking

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

*देश घडविण्यासाठी तरुणांची महत्त्वाची भूमिका*- *प्राचार्य डॉ मणेर*


*देश घडविण्यासाठी तरुणांची महत्त्वाची भूमिका*- *प्राचार्य डॉ मणेर*


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर,दि.३१, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वच्छ ग्राम व आरोग्य संवर्धनासाठी युवा या विशेष श्रम संस्कार शिबिराचा सांगता समारंभ मौजे तिर्थ खुर्द येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी वरील प्रतिपादन केले, आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते पुढे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेकांनी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे,इतकेच नव्हे तर १९९३ च्या भूकंपात किल्लारी या ठिकाणी स्वयंसेवकांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली होती, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजास आवश्यक असे सामाजिक व्यक्तित्व निर्माण होत असते,अशा शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होत असते,ज्या प्रमाणे बाबा आमटे यांनी निस्वार्थ भावनेने कुष्ठरोग्यांच्या साठी कार्य केले त्याचप्रमाणे तरुणांनी कार्य करावे, दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी स्वत:चे मन स्वच्छ लागते आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांची आणि ग्रामस्थांची मने स्वच्छ होत असतात,ते पुढे म्हणाले की तिर्थ खुर्द येथील ग्रामस्थांनी खूप उत्कृष्ठ प्रकारचा सहयोग शिबिरासाठी दिला , आपल्या अवतीभवती कचरा टाकणे हे सभ्य पणाचे लक्षण नाही,आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवावा असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.यावेळी ग्रामस्थ पटाडे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले,सदर शिबिरामध्ये दि २५ पासून स्वच्छता अभियान,नाले सफाई ,गाव रस्ता स्वच्छ करणे,मास्क वाटप, वृक्षारोपण, प्रबोधनपर कार्यक्रम, विद्यार्थी गटचर्चा आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले, निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बीरुदेव सोनटक्के हे होते,तर रामदास पवार,विश्वभंर पटाडे ,विनोद जाधव, नितिन जाधव,मयुर जाधव यांचे अनमोल सहकार्य लाभले, शिबीराचे अहवाल वाचन कार्यक्रमाधिकारी प्रा व्ही एच चव्हाण यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.बी डब्ल्यू गुंड,प्रा. ए बी वसेकर ,प्रा.डॉ.ए.बी गायकवाड,प्रा.एस.सी सुरवसे,प्रा.बी.जे कुकडे , डॉ.रामा रोकडे यांनी पुढाकार घेतला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रतिक्षा सिध्दगणेश बी.ए भाग एक हिने केले तर आभार कु साखरा कांबळे बी ए भाग एक हिने केले,कार्यक्रमाप्रसंगी सर्व स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा