भरणे मारणार चौकार! हर्षवर्धन
टीमचा चौथा स्टार खेळाडू परततोय टीम राष्ट्रवादीत !
इंदापूर :-प्रतिनिधी
शशिकांत सोनटक्के
इंदापूरच्या राजकारणात सध्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणे जोरदार फटकेबाजी करत आहेत. हर्षवर्धन पाटलांचा टीमला दररोज गळती लागली असून महत्त्वांच्या पदांवरील कार्यकर्ते राज्यमंत्री भरणे यांच्यासोबत जाताना दिसत आहेत.
माजी जिल्हा परिषद श्रीमंत ढोले, पंचायत समिती सभापती स्वाती शेंडे व त्यांचे पती बापूराव शेंडे,
हर्षवर्धन पाटलांचे नातेवाईक प्रशांत पाटील ही आतापर्यंतची भाजपा सोडणाऱ्या मधील मोठी नावे आहेत.आता आणखी एक महत्त्वाचा चेहरा हर्षवर्धन पाटलांची साथ सोडण्याच्या वाटेवर आहेत.
गेले अनेक दिवस भाजपात असलेले युवानेते दिपक जाधव अस्वस्थ असल्याची चर्चा होती. हर्षवर्धन पाटलांनी त्यांची भेट घेऊन समजूत घेत घालण्याचा
प्रयत्नही केला होता. पण सध्या दिपक जाधव राज्यमंत्री दत्तात्रय भरणें सोबत एका गाडीतून फिरताना दिसत आहेत. भरणेंच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती दिसत आहे. त्यामुळे दिपक जाधव आता राष्ट्रवादीत गेले असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
येत्या ३ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लाखेवाडीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळेस होणार असलेल्या मेगा राष्ट्रवादी प्रवेशात
दिपक जाधवही असण्याची शक्यता बळावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा