सिंहगड रोड धायरी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे महिलादिन साजरा
पुणे (प्रतिनिधी):- सिंहगड रोड धायरी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे महिला दिनानिमित्त प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शुभांगी भगत,माधवी सुरते,शीतल घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मी जिजाऊ बोलतेय ह्या विषयावर विश्वकीर्ती घाडगे ह्या चिमुकलीने सादरीकरण केले. सूत्रसंचालन संघमित्रा मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राणी पिसे यांनी केले. यावेळी सोसायटीतील रविना कक्कड, संस्कृती पिसे, श्रेया सुरते, दिव्या मोरे, पूनम शिंदे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा