*तामलवाडी परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावे,या मागणीसाठी सम्राट मौर्य सेनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
दिनांक,9 मार्च 2022,रोजी पोलिस अधिक्षक उस्मानाबाद यांना सम्राट मौर्य सेनेच्या वतिने निवेदन देण्यात आले आहे,या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे तामलवाडी गाव व आजुबाजुच्या परिसरात धाबे,हॉटेल,लॉजिंग विनापरवाना तसेच गुटखा विक्री,अवैध दारू विक्री , अवैधरित्या वाळू विक्री,मटका क्लब इत्यादी अवैध धंदे विनापरवाना चालू आहेत,सदरील अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पोलिस प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही ,सदरील सर्व अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत,समाजात शांतता व कायदा सुव्यवस्था टिकुन राहण्याकरिता लवकरात लवकर कार्यवाही होणे गरजेचे आहे,अशी मागणी सम्राट मौर्य सेनेच्या युवक प्रदेश अध्यक्ष राघवेंद्र चाबुकस्वार यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनावर राघवेंद्र नारायण चाबुकस्वार यांची स्वाक्षरी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा