Breaking

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत


बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत 


कन्हेरगाव (प्रतिनिधी)
              महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य शिक्षण मडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12 वी बोर्ड परीक्षेस सुरुवात शुक्रवारी पासून झाली असून इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता.या परीक्षेसाठी मा‌.बबनरावजी शिंदे माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात अकोले (खु .) येथे 12 वी बोर्ड परीक्षा केंद्राच्या वतीने परीक्षार्थ्यांचे परीक्षेसाठी स्वागत करण्यासाठी प्रशालेच्या गेटजवळ  भव्य रांगोळी सजावट करून तसेच औक्षण व गुलाब पुष्प देऊन स्वागत  अकोले(खु)च्या सरपंच रुपालीताई नवले तसेच सरपंच प्रतिनिधी कांतीलाल नवले,उपसरपंच कुबेर महाडीक, सोसायटीचे चेअरमन हरीदास पाटील, प्रशालेचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख राजेंद्र ठोंबरे सर,दिपक पाटील,विनोद पाटील सर,माजी सरपंच महादेव घाडगे, किसन घाडगे,अशोक पाटील,माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील,पंडित नाना पाटील,माढा तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष अनिल तोडकर,कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे,सतीश लिंगे,कृष्णराज नवले,ग्रामपंचायत सदस्य आप्पा हांडे,गणेश बनसोडे तसेच विद्यार्थी पालक,पर्यवेक्षक,शिक्षक-शिक्षिकांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन तसेच महिला शिक्षिकांनी परीक्षार्थी मुलींचे औक्षण करून परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन परीक्षा केंद्रात भव्य स्वागत करण्यात आले . 
           अकोले (खु) येथे 12 वी बोर्ड परीक्षेचे मुख्य केंद्र असून या केंद्रात 226-सायन्सचे,69आर्टसचे,14 - कॉमर्सचे असे मुख्य केंद्रात एकूण - 309 विद्यार्थी परीक्षा देत असून या मुख्य केंद्राअंतर्गत यावर्षासाठी उपकेंद्र कंदर येथील कण्वमुनी विद्यालयात 45 आर्टसचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
        कोव्हिड 19 च्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी  प्रशालेतील केंद्राच्या वतीने योग्य ती दक्षता घेऊन भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षेस प्रारंभ झाला आहे .
या कार्यक्रम प्रसंगी शिवाजी नगर पोलीस स्टेशन पुणे येथील पी.आय . अंकुश चिंतामण हेआवर्जुन उपस्थित होते. तसेच अकोले (खु) येथील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ,विद्यार्थी पालक,प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा