Breaking

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

ढवळसच्या अर्चना अनभुले हीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड .....


ढवळसच्या अर्चना अनभुले हीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड .....

.... मुलींच्या मध्ये राज्यात दहावा क्रमांक....
...गरीब परिस्थितीतून मिळवले कष्टसाध्य यश....


 बेंबळे ।प्रतिनिधी                       फोटो

       माढा तालुक्यातील ढवळस येथील शेतकरी मधुकर अनभुले यांची कन्या अर्चना मधुकर अनभुले हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवले असून तिची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.  अर्चना मधुकर अनभुले हीचे प्राथमिक शिक्षण जगदंबा विद्यालय ढवळस येथे तर बारावीपर्यंतचे शिक्षण के एन भिसे कॉलेज कुर्डूवाडी येथे झाले आहे. आई वडील गरीब शेतकरी असल्यामुळे अर्चनाची पुढील शिक्षणाची वाट अवघड होती परंतु जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची तीव्र इच्छा असल्याने अर्चना हिने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर च्या मुक्त विद्यापीठातून , घरून अभ्यास करून प्रथम बी ए व नंतर एम ए (फर्स्ट क्लास)  अशी व्दिपदवी प्राप्त केली व यानंतर जिद्दी अर्चनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासही घरी बसून सुरू केला. 
         जनावरांच्या धारा काढणे,पीकांचे खुरपण करणे, वीहिरीतील मोटर चालू करून पिकांना पाणी देणे अशा प्रकारच्या शेतीच्या सर्व कामात आई- वडिलांना मदत करत अर्चना हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा काळजीपूर्वक अभ्यास  केला व पहिल्याच प्रयत्नांमध्ये तिला घवघवीत यश प्राप्त झाले, व संपूर्ण राज्यात अर्चना ही मुलींच्या मध्ये दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली व  तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे. या पुढे ती नाशिक येथे पुढील प्रशिक्षणासाठी जाणार असून त्यानंतर आणखी पुढच्या स्पर्धा परीक्षा देण्याची अर्चना हीची मानसिकता आहे .
ढवळस येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष अनभुले यांची अर्चना ही चुलत बहिण आहे,  तिला माजी सरपंच ढवळे व बंधू संतोष यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य  लाभले . एका गरिब शेतकर्याच्या मुलीने घरी बसून ,शेतीतील सर्व कामे करून  जीद्दीने मिळवलेल्या यशाबद्दल आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे रणजीत भैय्या शिंदे विक्रम दादा शिंदे आदी मान्यवरा सहित  शेकडो नागरिकांनी अर्चना चे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा