*बहुजन रयत परिषद तुळजापूर तालुका कार्यकारिणी बैठक श्री ईश्वर क्षीरसागर व प्रमुख पाहुणे सोमनाथ कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब व बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ,कोमलताई (साळुंके) ढोबळे यांच्या आदेशानुसार,बहुजन रयत परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री ईश्वर क्षीरसागर यांच्या हस्ते,आज दिनांक 7 मार्च, 2022.,रोजी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात बहुजन रयत परिषद तालुका पदाधिकारी व शहर पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करून नियुक्ती पत्र देण्यात आले,यामधे बहुजन रयत परिषद तुळजापूर तालुका अध्यक्षपदी अविनाश रसाळ,यांची निवड करण्यात आली, व श्री श्रीपाद मसलेकर तालुका सल्लागार,श्री अभिमान सगट तालुका संपर्कप्रमुख, ईश्वर रसाळ (युवक शहर उपाध्यक्ष), अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी, मराठवाडा संपर्क प्रमुख सोमनाथ भाऊ कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजय महापुरे, जिल्हा उपाध्यक्ष राजू गायकवाड,शहराध्यक्ष श्री अभिजीत देडे, माजी उपसभापती श्री विलास (भाऊ) डोलारे, श्री नवनाथ डोलारे, प्रहार संघटनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे, यांच्यासह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा