Breaking

बुधवार, ९ मार्च, २०२२

महिला दिनानिमित्त भाजपा यूवती मोर्चाच्या ॲड पूजाताई देडे यांच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव व गरजु महिलांना १०० साडी वाटपाचा भव्य उपक्रम संपन्न*


*महिला दिनानिमित्त भाजपा यूवती मोर्चाच्या ॲड पूजाताई देडे यांच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव व गरजु महिलांना १०० साडी वाटपाचा भव्य उपक्रम संपन्न*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


भाजपा यूवती मोर्चाच्या मराठवाडा उपाध्यक्षा तथा प्रदेश कार्यकारणी सदस्या‌ ॲड मा पूजाताई देडे(ताईसाहेब) यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा श्री नितीनजी काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा गुणगौरव व गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू १०० साडयांचे वाटप करण्यात आले
 प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री नितीनजी काळे साहेब व ॲड मा पूजाताई देडे (ताईसाहेब) व  यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिला डॉक्टर वकील इंजिनिअर शिक्षिका उदयोगपती व्यावसायिक मजूर महिला आदिंचा सत्कार व सन्मान करण्यात आला तसेच गरजु व उपेक्षित महिलांना १०० साड्यांचे वाटप करण्यात आले
  कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनजी काळे साहेब यांनी सर्व स्तरातील महिलांच्या पाठिशी खंबीर उभे राहुन उपेक्षित महिलांच्या विकासाकडे लक्ष देऊ असे सांगितले तर कार्यक्रमाच्या आयोजिका ॲड मा पूजाताई देडे यांनी प्रथम भारमाता व नंतर सर्वकाही असे मत व्यक्त करत शोषित पीडित वंचित उपेक्षित महिलांना जोवर सर्वस्तरातून न्याय मिळणार नाही व खर्या अर्थाने त्यांचा सन्मान जोवर समाज मनातून होणार नाही व महिलांवरील वाढत्या कौंटुबिक व सामाजिक अन्याय अत्याचारांना आळा बसणार नाही तोवर खर्या महिला दिनाचे सार्थक होणार नाही असे मत व्यक्त केले
   यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ मीना सोमाजी, सौ नंदा पुनगुडे, सौ अंजली बेताळे, यूवा मोर्चा सरचिटणीस कु देवकन्या गाडे,
शहर उपाध्यक्ष मा संदीप इंगळे, मा अजय यादव, मा उदय देशमुख, विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्षा सौ प्रभावती मार्डीकर, डॉ सोनाली पाटील, डॉ रेणुका वडगावकर, डॉ वृंदाराणी विधाते, ॲड निषीगंधा क्षिरसागर, शिक्षिका ज्योती यादव, उद्योजिका अनुराधा मोरे, राणी मोटे,मनिषा देडे, मनिषा सुतार, झेंडे काकु, स्वाती देडे, आरती देडे, ओंकार देडे, आदि प्रमुख मान्यवरांची व मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती 
   सदर कार्यक्रमास महिलांनी भरभरुन प्रतिसाद दिला व सर्वांच्या वतीने ॲड पूजाताई देडे यांच्या समाजसेवेचे कौतुकही करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा